हे संकेतस्थळ "पंचायतराज विभाग, महाराष्ट्र राज्य" यांच्या महत्वाकांक्षी
योजना असलेल्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत' "जिल्हा
परिषद, छत्रपती संभाजीनगर" व "पंचायत समिती, सोयगाव" यांच्या
मार्गदर्शनाखाली गावातील सर्व नागरिकांना ग्रामपंचायतीच्या पारदर्शक
कारभारासाठी व सुविधेसाठी तयार करण्यात आली आहे।
यावर नागरिकांना एका क्लिकवर ग्रामपंचायती अंतर्गत चालू असलेल्या विविध
प्रकारच्या योजना, उपक्रम, कार्यक्रम, कार्यशाळा, ग्रामस्थरीय सर्व
अधिकार/कर्मचारी यांची नावे व संपर्क क्रमांक, गावातील शासकीय
कार्यालयांचे लोकेशन, जनसंख्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व
तक्रार निवारणासाठी तयार केलेल्या विविध समित्या व त्यांचे पदाधिकारी
माहिती, अधिक माहितीसाठी व संपर्क साधण्यासाठी नोडल स्वयंसेवकाची
नियुक्ती इत्यादी गोष्टी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत।
पुरुष : ९२९
स्त्री : ८३०
एकूण : १७५९
» ग्रामपंचायत कार्यालय हद्दीत उघड्यावर शौचाला बसण्यास साफ मनाई आहे.
कुणी नागरिक आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
» "सुंदर माझे अंगण" उपक्रमांतर्गत दर सोमवारी स्वच्छ अंगण ठेवणाऱ्या
महिलेचा सत्कार व भेटवस्तू देण्यात येईल.
» १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर भरल्यास
आकर्षक सूट देण्यात येईल.
» अधिक माहितीसाठी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा –
येथे क्लिक करा
"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" हे राज्य शासनाचे महत्वकांक्षी
अभियान असून, या अभियानात शिंदोळ गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी,
शेतकरी, कष्टकरी व तरूणांनी सक्रिय सहभाग नोंदवून गावाला आदर्श गाव
बनविण्यासाठी कंबर कसले आहे व त्या दिशेने गाव अग्रेसर होत आहे.
मला आशाचं नाही तर विश्वास आहे की, या अभियानाच्या माध्यमातून शिंदोळ गाव
हे फक्त भौतिक विकासाच्या दृष्टीनेच नव्हे तर सांस्कृतिक, अध्यात्मिक,
शैक्षणिक, आर्थिक व सुसंस्कृत दृष्टीने देखील आदर्श गाव म्हणून जगात
नावाजेल व आत्मनिर्भर होईल.